सिल्लोड : वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) :  वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप सिंह चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार सत्तार यांनी महाराणा प्रताप सिंह जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आमदार सत्तार यांनी स्वाभिमान, पराक्रम आणि मातृभूमीप्रती निष्ठा यांचे प्रतीक महाराणा प्रताप सिंह यांचे कार्य व विचार प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.

आमदार सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे तालुका शिवसेनेच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी केली. आमदार  अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, अशोक सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक सुधाकर गायकवाड, शेख इम्रान (गुड्डू), शेख बाबू, सिद्धेश्वर आहेर, सुनील दुधे, अशोक बन्सोड, जितू आरके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शाह, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक शंकरराव खांडवे, राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, शेख सलीम हुसेन, कृउबा समितीचे संचालक शेख जावेद, युवासेनेचे अक्षय मगर, राहुल महाजन, फहिम पठाण, राजेंद्र साठे तसेच मानसिंग राजपूत, डॉ. विकास गोठवाल, डॉ. मध्यमसिंग मेहेर, अमरसिंग राजपूत, विठ्ठल सिंग ठाकूर, शैलेश गौर, विक्रांत गौर, संदीप झलवार, प्रभुलाल झलवार, देवसिंग करघे, रामदास पवार आदींची उपस्थिती होती.